आदित्य ठाकरेंचे सरकारवर टीकेचे बाण : तर ‘ते’ लाडकी योजनाही बंद करतील !
Aditya Thackeray clearly said; The court is plotting to stop the Ladki Bahin scheme नाशिक (16 एप्रिल 2025) : ठाकरे गटाचा नाशिकमध्ये मेळावा झाला. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीकेचे बाण चालवले. गेल्या शंभर दिवसात या सरकारने एकही चांगली योजना आणलेली नाही शिवाय शेतकर्यांसाठी एकही चांगली योजना या सरकारने आणली नाही. महिलांसाठी एक तरी योजना आणली का? तरुणांसाठी तरी आणली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तरुण वर्गासाठी, शिक्षण घेणार्या किंवा नोकरी शोधणार्या युवकांसाठी सरकारने एकही योजना आणली नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केल.
लाडकी बहीण योजनेचे काय झाले? असा प्रति प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. या योजनेत ते आता पाचशे रुपयांवर आले आहेत. बहुमत ठासून आल्यानंतरही तुमच्या वचन नाम्यात असलेली एकही गोष्ट प्रत्यक्षात आणली जात नाही. आता त्यांचेच काही लोक कोर्टात जातील आणि कोर्टातून ही योजना बंद करतील, असा दावा देखील त्यांनी केला.

भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने आणि निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे हे सरकार आपल्या डोक्यावर बसलेले आहे. त्यांना दुसरा कोणताही आशीर्वाद नसल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांमध्येच राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. या सरकारमध्ये संवेदनशीलता तर नाहीच मात्र, हे राक्षसी सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली.
बीड प्रकरणात प्रमुख आका अद्याप समोर आलेला नाही. बीड प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्राला आका कोण हे माहिती आहे. मात्र तरी देखील तो अद्याप समोर आणला गेला नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात राजीनामा घ्या, आणि कारवाई करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील करत होते. मात्र, तरी देखील मुख्यमंत्र्यांचे हात का बांधले होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
