महाराष्ट्राचा अमृतकलश यात्रेचा उद्या मुक्ताईनगरातून प्रारंभ


Maharashtra’s Amrit Kalash Yatra begins from Muktai Nagar tomorrow भुसावळ (26 एप्रिल 2025) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशतर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा अमृतकलश यात्रा या सांस्कृतिक यात्रेचा शुभारंभ रविवार, 27 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मुक्ताईनगर येथून होणार आहे.

या मान्यरांची उपस्थिती
या यात्रेचा प्रारंभ आदिशक्ती मुक्ताई मंदिर, बोदवड रोड, मुक्ताईनगर येथून होणार आहे. यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, तसेच अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मंगल कलशात राज्यातील विविध नद्यांचे पाणी आणि जिल्ह्यातील माती संकलित करून, मुंबईतील हुतात्मा चौकात 1 मे रोजी अभिवादन केले जाणार आहे. या यात्रेचा उद्देश महाराष्ट्राच्या सामाजिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे दर्शन घडवणे आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ही कलश यात्रा आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई संस्थान (नवीन मंदिर) बोदवड रोडने निघून कोथळी मार्गे, वरणगाव तिरंगा चौक, नहाटा चौफुली, भुसावळ शहर,जामनेर रोड, अष्टभुजा देवी मंदीर, पांडुरंग टॉकीज, बाजारपेठ पोलिस ठाणे,तापी रोड वसंत टॉकीज, गांधी पुतळा, सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, जळगाव रोड, साकेगाव, नशिराबाद, कवियत्री बहीणाबाई चौधरी यांचे स्मारक असलेल्या आसोदा, जुने जळगावातील राम मंदिर,शनि पेठ, टॉवर चौक, राष्ट्रवादी कॉग्रेसपक्षाचे कार्यालय येथे कलश यात्रेचे स्वागत होईल. तेथून ही यात्रा पाळधी, धरणगाव, एरंडोल, पारोळा मार्गे अमळनेर येथे मुक्कामी राहणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !