भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भुसावळात उद्यापासून तीन दिवसीय कार्यक्रम

भुसावळ शहरात सकल ब्राह्मण समाजातर्फे उपक्रम


भुसावळ (27 एप्रिल 2025) : सकल ब्राह्मण समाजाच्या श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त 27 ते 29 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 27 एप्रिलला मोटारसायकल रॅली, 28 एप्रिल रोजी व्याख्यान तर 29 एप्रिल रोजी शहरातील प्रमुख मार्गाने पालखी मिरवणूक व शोभायात्रा निघणार आहे.

असे आहेत कार्यक्रम
भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्ताने तीन दिवसीय विविध कार्यक्रमामध्ये 27 रोजी सायंकाळी सहा वाजता जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरापासून मोटारसायकल रॅली निघेल. पु.ओं.नाहाटा चौफुली, जामनेररोड, बाजारपेठ पोलिस ठाणे, महाराणा प्रताप चौक, गांधी पुतळ्याच्या मार्गाने या रॅलीचा तापीनदीजवळील रेणूका माता, श्री. भगवान परशुराम मंदिरात समारोप होईल. सोमवार, 28 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलमध्ये पुण्यातील व्याख्याते अभिजीत मुंडे यांचे ‘शंभु गाथा’ या विषयावर व्याख्यान होईल.

मंगळवार, 29 रोजी सायंकाळी सहा वाजता अष्टभुजा मंदिरापासून शोभायात्रा निघेल. यात लेझीम पथक, ध्वज पथकाचे आकर्षण राहिल. सजवलेल्या पालखीत भगवान परशुरामाची प्रतिमा असेल. जामनेररोड, बााजरपेठ पोलीस ठाणे, महाराणा प्रताप चौक, वकिल गल्लीतून ही मिरवणूक निघू म्युनिसीपल पार्कमधील श्रीराम मंदिरात समारोप होईल. या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये सकल ब्राह्मण समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !