चोपडा ऑनर किलिंगने हादरले : लव्ह मॅरेज केलेल्या मुलीची पित्याकडून गोळी झाडून हत्या, जावई गंभीर


Chopra shaken by honor killing : Love-married girl shot dead by father, son-in-law critical चोपडा (27 एप्रिल 2025) : मुलीने इच्छेविरोधात प्रेम विवाह केल्याच्या रागातून सीआरपीएफमधून सेवानिवृत्त जवानाने गोळ्या झाडून मुलीची हत्या केली तर या घटनेत जावईदेखील गंभीर जखमी झाला आहे. चोपडा शहरातील आंबेडकर नगर (खाईवाडाजवळ) हा प्रकार काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला. यावेळी वर्‍हाडींनी गोळीबार करणार्‍या तरुणीच्या पित्यालाही चोपून काढले.

तृप्ती अविनाश वाघ (24) असे मृत विवाहितेचे तर अविनाश ईश्वर वाघ (28, दोघे रा.करवंद, शिरपूर, ह.मु.कोथरूड, पुणे) असे जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे.

काय घडले चोपडा शहरात
सुमारे दोन वर्षांपूर्वी घरच्यांच्या मर्जीच्या विरोधात तृप्तीने अविनाश वाघ या तरुणांसोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं. पण संशयीत आरोपी सासरा किरण अर्जुन मंगले (48, रा.रोहिणी, ता.शिरपूर) यांना विवाह पसंत नव्हता. प्रेमविवाहाचा राग मुलीच्या पित्याच्या डोक्यात होता. अविनाशच्या बहिणीचा साखरपुड्याचा कार्यक्रमासाठी तृप्ती व अविनाश हे दोघे चोपडा येथे दाखल झाले होते मात्र मुलीच्या वडिलांना ही माहिती कळताच त्यांनी चोपडा शहर गाठत हळदीच्या कार्यक्रमात आले.

तीन गोळ्या झाडल्या
हळदीचा कार्यक्रम आटोपल्या नंतर किरण आणि तृप्ती हे समोरासमोर आले. तृप्ती हिला पाहताच किरण मंगले यांनी त्यांच्याकड़ील रिव्हॉल्वरमधून तीन गोळ्या झाडल्या. या घटनेत मुलगी तृप्ती जागीच ठार झाली. तिला वाचवण्यासाठी अविनाश गेल्यानंतर एक गोळी अविनाशच्या पाठीतून निघून पोटात घुसली व दुसरी गोळी हाताला लागल्याने तोही गंभीर जखमी झाला. अविनाश याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला हलविण्यात आले आहे.

माजी सैनिकाला मारहाण
हळदीच्या कार्यक्रमात घडलेल्या या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत मुलीचे वडील माजी सैनिक अर्जुन मांगले हे देखील गंभीर जखमी झाले. शनिवारी रात्री 12.15 वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !