भुसावळातील ताप्ती स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम : पक्षांची तहान भागण्यासाठी जलपात्राची सोय


Initiative by students of Tapti School in Bhusawal: Provision of water bowls to quench the thirst of birds भुसावळ (27 एप्रिल 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उन्हामुळे नदी, तलाव या ठिकाणापासून दूरवर पाणी मिळत नसल्याने पक्षासाठी जलपात्राची सोय केली आहे. जंगल परिसरात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पर्यावरण संतुलन बिघडले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत कमी झाला आहे. उन्हाळ्याच्या उकाड्यापासून बचाव होण्यासाठी ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी शहरात व शाळा परिसरात पाण्याचे डोंगे व प्लास्टिकच्या प्लेटमध्ये तसेच मातीच्या प्लेटमध्ये पाणी टाकून गच्चीवर ठेवले तर काही झाडांवर ते लावण्यात आले शिवाय अन्नाचीही व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर सह विद्यार्थी व शिक्षक वर्ग सहभागी झाले. उन्हाळ्यात पक्षांना पाणी न मिळाल्यामुळे ते मरण पावतात उन्हाळ्यात पक्षांना पाणी मिळावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

300 ठिकाणी लावले डोंगे
शहरात व शाळा परिसरात झाडावर व गच्चीवर पक्षांना उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी 250 ते 300 ठिकाणी डोंगे लावले आहे तसेच सुट्ट्यांमध्येही या डोंग्यात पाणी टाकले जाणार आहे. एप्रिल व मे महिन्यापर्यंत उन्हाळा कमी होईस्तोवर पक्षांना रोज पाणी टाकले जाणार असल्याचे ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर म्हणाल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !