जामनेरात शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न : महाराष्ट्रदिनाची खळबळजनक घटना


Farmer attempts self-immolation in Jamner : Sensational incident on Maharashtra Day जामनेर (1 मे 2025) : राज्यभरात महाराष्ट्र दिनानिमित्त शांततेत ध्वजारोहण झाले असताना जामनेरात मात्र शेतकर्‍याने ध्वजारोहणादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. जमिनीची मोजणी होत नसल्याने खर्चाणे, ता.जामनेर येथील शेतकरी बाबुराव बंडू पाटील यांनी भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर आत्मदहनचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी आठ वाजता घडला.

काय घडले जामनेरात
शेतकरी बाबूराव पाटील यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यापासून भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी यांना वेळोवेळी अर्ज देवून तसेच जामनेर येथील कार्यालयात जावून देखील सबंधित अधिकारी विषय समजून घेत नाहीत. शेतजमिनीची मोजणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित पोलिसाने त्यांना रोखल्याने अप्रिय घटना घडली मात्र आता भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी काय दखल घेतात? याकडे लक्ष लागले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !