कौटूंबिक वादानंतर पतीने केली पत्नीसह सावत्र मुलीची हत्या


Husband kills wife and stepdaughter after family dispute न्युज डेस्क । अकोला (7 मे 2025) : शनिवारी अकोल्यातील तारफैल परिसरातील सिद्धार्थ नगरात घरगुती वादातून पतीने पत्नी आणि तीन वर्षांच्या सावत्र मुलीची गळा दाबून हत्या केली. सुरज गणवीर (37, रा. सिद्धार्थ नगर, अकोला) असे आरोपीचे तर पत्नी अश्विनी (28) व मुलगी आरोही (3) ई खून झालेल्यांची नावे आहेत.

अश्विनी ही सूरज याची दुसरी पत्नी होती. अश्विनीला पहिल्या पतीपासून आरोही ही मुलगी होती. मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये सतत घरगुती वाद होऊन भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशी आरोपी सूरज हा जेवण करण्यासाठी घरी आला होता. तो जेवण करत असतानाच अश्विनीने वादाला सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने सुरजने प्रथम पत्नीचा दुपट्टयाने गळा दाबून खून केला व त्यानंतर त्याच पद्धतीने तीन वर्षीय सावत्र मुलीचाही गळा दाबून जीव घेतला.

घटनेची माहिती मिळताच शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी तसेच रामदासपेठ पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक अरुण परदेशी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. रामदासपेठ पोलिसांनी आरोपी सुरज गणवीर याला अटक केली असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीने पोलिसांना दिली माहिती- पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी सुरजने रामदासपेठ पोलिसांना खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता आरोपी घरी बसून होता. पत्नी अश्विनी सुरजसोबत विविध मुद्यांवरुन नेहमी वाद घालत असायची अशी माहिती पोलिसांनी दिली.

अश्विनीसोबत लग्न झाल्यानंतरही, सूरजची पहिल्या पत्नीपासूनची मुले त्याच्या घरी येत असत. तेव्हा अश्विनी त्यांच्याशी तुसडेपणाने वागत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, अश्विनीवर जवळपास एक लाख रुपयांचे कर्ज होते, जे सूरजने स्वतःच्या खर्चाने फेडले होते. तरीदेखील त्यांच्यातील वाद आणि तणाव कायम होता. मुलांना अश्विनीकडून सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याने सूरज तणावात होता.

पत्नी आणि मुलीचा खून केल्यानंतर आरोपी सूरजने या दोघींच्या तोंडात जेवणाचा शेवटचा घास घातला. पोलिसांनी पंचनामा सुरू केला, तेव्हा दोघींच्या तोंडात पोळी व भाजीचा घास दिसून आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !