कुख्यात गुंड गजा मारणेसोबत ढाब्यावर मटन पार्टी : सहाय्यक निरीक्षकासह पाच पोलिसांचे निलंबन


Notorious goon Gaja Marane along with mutton party at dhaba: Five policemen including assistant inspector suspended पुणे (14 मे 2025) : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे सोबत महामार्गावर मटन पार्टी करणार्‍या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमका प्रकार
येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गुंड गजा मारणे याने ढाब्यावर ‘मटण पार्टी केली. ही माहिती समोरर येताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित केले.

मारणेला कारागृहात नेत असताना त्याच्याबरोबर मोटारीचा ताफा होता. त्याला ढाब्यावर भेटणार्‍या सराईतांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीत प्रकार कैद
सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला सांगली येथील कारागृहात नेण्यात येत असताना रस्त्यावरील एका ढाब्यावर मारणेची व्हॅन थांबविण्यात आली. बंदोबस्तात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचार्‍यांनी त्याच्याबरोबर ढाब्यावर जेवण केले. मारणेच्या व्हॅनबरोबर असलेल्या मोटारीतील साथीदारांनी मारणेला बिर्याणी दिली. मारणेला तेथे सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते हे भेटले. विशाल धुमाळ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

सहा जणांना निलंबित करण्याचा आदेश
मारणेच्या मटण पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी चौकशी केली. चौकशीत दोषी आढळलेल्या सहायक निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्याचा आदेश त्यांनी दिला.

रोहिणी खडसेंनी व्यक्त केले आश्चर्य
पोलीस संरक्षणात असताना महामार्गावरील एका ढाब्यावर गजा मारणे याने ‘मटन पार्टी’ आयोजित केल्याचा धक्कादायक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत. मोक्का कारवाई अंतर्गत शिक्षा भोगणारा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात शिफ्ट करताना मारणे आणि पोलिसांनी मस्त मटण पार्टी झोडली अशा बातम्या आहेत, दोषी पोलिसांना कायमस्वरुपी निलंबित करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना असल्याचे अ‍ॅड.खडसे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !