अजित पवार स्पष्टच म्हणाले ; एखाद्याला खासदारही करतो व म्हटले तर पाडूनही दाखवतो
Ajit Pawar clearly said ; He makes someone an MP and even demolishes them if asked अकोले (16 मे 2025) : मी तसा तुमच्या शब्दाचा पक्का आहे. पाणी देण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. छत्रपती सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या जय भवानी पॅनलच्या प्रचारार्थ अकोले येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, मी ठरवले तर एखाद्याला खासदारही करतो व म्हटले तर त्याला पाडतोदेखील, असेही ते म्हणाले.
खडकवासला कालव्यावरील पाणी गळती रोखण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक, तसेच निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार व अकोले येथील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, खडकवासला कालव्यावरील शेतकर्यांना प्रत्येकवेळी पाणी संकटाला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी वाढत चालली आहे. मात्र, पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचे नियोजन करण्यात येते. पाणी टेल टू हेड कमी पडत असल्याने मुळशी धरणातून पाणी खडकवासला कालव्याला देण्याचा विचार असून त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.


