मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठी प्रशिक्षण घेणं ही काळाची गरज : तहसीलदार निता लबडे

भुसावळ येथे लाठीकाठी प्रशिक्षणाचे उद्घाटन


Tehsildar Nita Labde भुसावळ (17 मे 2025) : देशाची प्रत्येक मुलगी ही झाशीची राणी आहे. मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठी प्रशिक्षण घेणं ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार निता लबडे
यांनी आपल्या उद्घाटन पर मनोगतात व्यक्त केले. प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमचा फिटनेस फिजिकल आणि मेंटल चांगला ठेवू शकतात असे ही मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

प्रशिक्षणाचे उद्घाटन तहसीलदार निता लबडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रेल्वे विजिलांस ऑफिसर रेखा मिश्रा, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत लाहोटी उपस्थित होते.

200 मुलींचा सहभाग
विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वहिनी तर्फे जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या मैदानावर मुलींसाठी दहा दिवसांचा लाठी काठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग व्हावा. मुलींचे मन आणि मनगट मजबूत करण्याच्या हेतूने सकाळ आणि संध्याकाळ या दोन सत्रात शहरातील मुलींसाठी लाठी काठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. 200 मुलींनी सहभाग नोंदविला आहे. परी जीवन महाजन या प्रशिक्षक मुलीने लाठी काठी व तलवारबाजीचे सुंदर असे प्रात्यक्षिक सादर केले. सूत्रसंचालन सोनल शर्मा यांनी केले. आभार वरून इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, प्रशिक्षणार्थींच्या पालकांची उपस्थिती होती.

मुलींनी स्वतःला कमकुवत समजू नये
मुलींनी स्वतःला कमकुवत समजू नये. लाठी प्रशिक्षणाचे कौशल्य आत्मसात करून गरज भासल्यास या कौशल्याचा उपयोग करावा, असे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !