अजित दादा पवारांनी पालिका निवडणुकांची तारीखच सांगितली : कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे केले आवाहन
Ajit Dada Pawar announces the date of municipal elections : Appeals to workers to get to work नाशिक (19 मे 2025) : सुमारे चार वर्षांपासूनच्या अधिक काळापासून पालिका निवडणुका लांबल्याने सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींना निवडणुका कधी होणार याबाबत उत्सुकता आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता सत्तेतील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना निवडणुका तोंडावर आल्याने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पालिका निवडणुका होणार असल्याने आतापासून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाशिकमध्ये दिल्या आहेत.
भारताने ताकद दाखवली
पवार म्हणाले की, पहलगाम येथे आपल्या देशातील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे ही मागणी होती. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते काम केले, पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या सैन्याने चोख उत्तर देत जगाला भारताची ताकद दाखवून दिली, त्यांना मी सॅल्युट करतो, असे अजित पवारांनी नाशिक येथील सभेत बोलताना म्हटले. तुम्ही मजबुतीने सरकारच्या मागे उभं राहिले पाहिजे, असेही अजित पवारांनी म्हटले. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.
पालिक निवडणुकांबाबात अजित पवारांनी दिली ही माहिती
राज्यात सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी, इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत समित्या, जिल्हा परिषदा उभारल्या. त्या माध्यमातून पुढे आलेलं नेतृत्व हे राज्यात आणि देशात विविध पदापर्यंत पोहोचल्याचं आपण पाहिलं आहे. खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 2022 मध्ये व्हायला पाहिजे, पण आता 2025 उजाडला आहे. आता, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे अजित पवारांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने पुढील खसा महिन्यात निवडणुका घ्या, असे निर्देश दिल्याचा संदर्भ अजित पवारांनी आपल्या भाषणातून दिला. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असेही त्यांनी म्हटले. पूर्वीप्रमाणेच ओबीसींना 27 टक्के आरक्षणाच्या जागा राखीव असणार आहेत. त्यामुळे, या निवडणुकांमध्ये विविध कार्यकर्त्यांना उभारी मिळेल, त्यांनी काम करुन दाखवावं, असे आवाहनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले.
कळवण, सुरगाणा, पेठ हा डोंगरी, आदिवासी भाग आहे. येथील एज्युकेशन सोसायटीमुळे इथं अनेक मुलं घडत आहे, त्याचं मी अभिनंदन करतो. 35 वर्षांपासून मी खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. मी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करत असताना मोठा निधी शिक्षण विभागाला देत असतो. सर्व पुढची पिढी घडावी यासाठी ह्या शिक्षण संस्था सुरू राहणे गरजेची आहे. विविध संस्थांनी पुढे येऊन निधी द्यावा असे आवाहन करा, मी पण करेल असेही अजित पवारांनी संस्थांच्या आर्थिक अडचणीसंदर्भात बोलताना म्हटले.