गुन्हे शाखेची कामगिरी : तेलंगणा राज्यात खून करून जळगावात लपलेल्या संशयीताला बेड्या

Crime Branch Performance : Suspect who committed murder in Telangana state and was hiding in Jalgaon arrested जळगाव (19 मे 2025) : तेलंगणा राज्यात खून करून तीन महिन्यांपासून जळगावात लपून असलेल्या संशयीताला जळगावातील स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय घडले जळगावात ?
तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील चंदानगर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जळगावात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर
चंदानगर पोलीस स्टेशनचे पथक जळगावात आल्यानंतर त्यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची भेट घेत मदत मागितली.
पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना या पथकाला सहकार्य करण्याचे निर्देश दिल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील आणि पोलीस हवालदार अक्रम शेख यांनी आरोपी अझहर निजाम खाटीक यास मेहरुण परिसरातून पाठलाग करून ताब्यात घेत कायदेशीर कारवाईसाठी त्याला चंदानगर पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात दिले.
