वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : आरोपी सासर्यासह दीराची कोठडीत रवानगी
पुणे (23 मे 2025) : राज्यात गाजत असलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी सासरा व दीराला अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासर्याला राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी दुपारी त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघांना 28 मे पर्यंत 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे.