धनंजय मुंडे यांना क्लीनचीट मिळाल्यास आपला राजीनामा निश्चित ! : मंत्री छगन भुजबळ
If Dhananjay Munde gets a clean chit, his resignation is certain! : Minister Chhagan Bhujbal मुंबई (24 मे 2025) : विविध आरोपांमुळे मंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागलेल्या धनंजय मुंडे यांना क्लीनचीट मिळताच आपण त्याच क्षणी मंत्री पदाचा त्याग करू, अशी ग्वाही नूतन मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
मंत्री भुजबळ स्पष्टपणे म्हणाले की, काँग्रेस फुटली त्यावेळी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो.
भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले, तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला सता छगन भुजबळ म्हणाले, उद्या जर धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं, तर माझी काहीही हरकत नाही.
मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय. मला सन्मानाने परत बोलावले. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले. त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन, असे विधान छगन भुजबळ यांनी यावेळी केले.