लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी : समोर आली ‘ही’ तारीख


When will the May installment be paid to beloved sisters : ‘This’ date has come to light जळगाव (26 मे 2025) : मे महिना संपायला आता अवघ्या आठवडा उरला आहे. याउपर लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले नाहीत. यामुळे मे चा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले असताना आता मे महिन्याच्या हप्त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची बातमी हाती आली आहे.

लवकरच खात्यात जमा होणार रक्कम
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून, यासाठी शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवला आहे. मे महिन्याच्या हप्त्यासाठी 335 कोटी 70 लाख रूपयांचा निधी आदिवाली विकास विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती समोर आलेली आहे.

2100 रुपयांचे आश्वासन हवेत
महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा 1500 रूपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी रक्कम 1500 वरून 2100 रूपये वाढवण्याचं आश्वासन सरकारमधील नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र, सत्तेत आल्यानंतरही ही वाढ अजून अंमलात आलेली नाही.

सामाजिक न्याय मंत्र्यांची नाराजी
सरकारकडून दरमहा पैसे देण्यासाठी विविध खात्यांमधून निधी वळवावा लागत आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट निधीच्या या वळवावळवीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जर सरकारला सामाजिक न्याय विभागाची गरज वाटत नसेल तर, हा विभागच बंद करा’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसेच ‘सरकार या खात्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे’, असा आरोपही त्यांनी केला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !