अकरावी प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवा ; संकेतस्थळ सुरळीत सुरू करा
शिवसेनेतर्फे भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना दिले निवेदन

Extend the deadline for the 11th admission process; launch the website smoothly भुसावळ (27 मे 2025) : शासनाने इयत्ता आकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया 26 ते 28 मे दिली आहे परंतु अर्ज भरण्याची साईट संकेतस्थळ हे वारंवार बंद पडत आहे आणि एकच दिवस बाकी असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे. संबंधित संकेतस्थळ हे सुरळीत सुरू करावे आणि प्रवेश अर्ज प्रकियाची मुदत ही वाढवून द्यावी, अशा मागणीचे निवेदन आज मंगळवार, 27 रोजी शिवसेनेतर्फे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना देण्यात आले.
मुदतवाढीची मागणी
भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्जाची तारीख 26 ते 28 मे दिली होती. परंतु काल सकाळपासून अर्ज भरण्याची संबंधित साईट संकेतस्थळ हे वारंवार बंद पडत असून विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरायचे कसे? त्यातच प्रवेशाची 28 ही शेवटची मुदत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे. काही विद्यार्थ्यांसह पालकांनी ही बाब शिवसेना भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी यांच्याकडे ही मांडली. तालुक्यातील विद्यार्थ्यांचा हिताचा आणि भविष्याचा विचार करून शिवसेनेतर्फे मंगळवारी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन त्यांना दिलेली संकेतस्थळ हे सुरळीत सुरू करा आणि शेवटची 28 तारीखची मुदत वाढ करून देण्यात यावी. जेणेकरून कोणत्याही विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या सर्व बाबी प्रांत यांच्या समोर मांडल्या. याला प्रांत जितेंद्र पाटील यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत प्रवेश अर्जाची मुदत वाढवून देण्याची ग्वाही शिवसेना पदाधिकारी यांना दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी निवेदन देताना भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा प्रभारी तालुकाप्रमुख संतोष माळी, भुसावळ शिवसेना शहर प्रमुख पवन नाले, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख नंदा निकम, तालुका प्रमुख वर्षा तल्लारे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, सुरेश कोल्हे, अल्पसंख्यांक उप जिल्हा संघटक हमीद शेख, युवक तालुकाप्रमुख राहुल बावणे, दीपक धांडे, प्रकाश निकम, भुसावळ शहर संघटक मयूर सुरवाडे, रुपेश चावरीया, पिंटू भोई, शांताराम बहिरम आदी शिवसैनिक उपस्थित होते.
