‘प्रहार जनशक्ती’ पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या पदाधिकार्‍यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश


Office bearers who left ‘Prahar Janshakti’ party join Congress यावल (27 मे 2025) : यावल शहरातील प्रहार जनशक्ती पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री एका कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा माजी आमदार शिरिष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सुदर्शन चित्रमंदिर चौकात पार पडला. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला फायदा होण्याची चिन्ह आहेत.

शहरातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यातील मोहम्मद हकीम मोहम्मद याकूब, उमर अली कच्छी, शेख निसार शेख हमीद, मोहम्मद रफीक हाजी फारुक शेख, आताऊल्ला खान, अब्दुल करीम मन्यार, शरीफोद्दीन शिराजीउद्दीन सह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला. माजी आमदार शिरिष चौधरी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, डॉ.अब्दुल करीम सालार, मुक्ती हारून नदवी,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, जमील शेख सह अनेकांच्या उपस्थितीत हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शहरातील सुदर्शन चित्रमंदिर चौकात हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.




कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समितीचे माजी गटनेचा शेखर पाटील, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, नईम शेख, गुलाम रसुल शेख, समीर मोमीन यांनी केले होते. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे काँग्रेसची पकड मजबूत झाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !