पाच लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकारी जाळ्यात : छत्रपती संभाजी नगरात खळबळ

Deputy Collector caught taking bribe of Rs 5 lakhs: Excitement in Chhatrapati Sambhaji Nagar छत्रपती संभाजीनगर (27 मे 2025) : पाच लाखांची लाच घेताना शहरातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना अटक करण्यात आली. या कारवाईने महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आह.े
काय घडले नेमके
वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठीपूर्वी या निवासी उपजिल्हाधिकार्यांनी मोठ्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार, संबधित तक्रारदाराकडून 23 लाख रुपये घेण्यात आले मात्र त्यानंतरही 18 लाख पुन्हा मागण्यात आले. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत ही लाच घेताना एसीबीने कारवाई केली.

