राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणी ठरणार अपात्र : जाणून घ्या नेमकी बातमी !


Lakhs of beloved sisters across the state will be disqualified: Know the exact news! मुंबई (2 जून 2025) : ही बातमी लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक आहे. निकषात न बसणार्‍या आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असताना आता राज्य सरकारकडून लाभार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या मर्यादेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. येत्या दहा दिवसांत केंद्र सरकारकडून अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या योजनेतील खरे लाभार्थी निश्चित होणार आहेत.

मोठ्या प्रमाणावर बहिणी होणार अपात्र
या तपासणीत मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मर्यादा ओलांडल्याचे आढळून आले, तर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या योजनेतून बाद ठरण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजेारीवर आर्थिक ताण पडत आहे. या योजनेत सुमारे 2 कोटी 65 लाख लाभार्थी महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत आहेत. एप्रिलपर्यंत 9 हप्ते म्हणजेच 13 हजार 500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मे महिन्याचा लाभ अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. योजनेच्या अटींनुसार महिला बाल विभागाकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे. या तपासणीत आतापर्यंत राज्यातील 11 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान, लाडक्या बहिणींसाठी सरकारने आदिवासी विभागाचे बजेट वळते केले असले तरी राज्यातील बहिणींना मे महिन्यांचा लाभ जून महिना उजडला तरीही मिळलेला नाही. त्यामुळे 1500 रुपये कधी मिळणार ? याकडे बहिणींचे लक्ष लागले आहे.

लाभार्थींची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थींनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 2289 सरकारी कर्मचार्‍यांचा लाभ बंद केला असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !