जळगाव पोलिस दलात बदल्यांचे वारे : गुन्हे शाखेच्या नूतन पोलिस निरीक्षकपदी संदीप पाटील

गुन्हे शाखेचे बबन आव्हाड आता एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक


Winds of transfers in Jalgaon Police Force : Sandeep Patil as the new Police Inspector of Crime Branch जळगाव (2 जून 2025) : जळगाव पोलिस दलातील अनेक बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सोमवारी रात्री केल्या. सर्वाधिक महत्त्वाचे पद असलेल्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली तर त्यांच्या जागी एमआयडीसी निरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

बदली झालेले अधिकारी व मिळालेले नवीन नियुक्तीचे ठिकाण असे

जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन मारुती आव्हाड यांची एमआयडीसी ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली.

एमआयडीसी पोलिस निरीक्षक संदीप भटु पाटील यांची गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

चोपडा ग्रामीणच्या निरीक्षक कावेरी महादेव कमलाकर यांची शनिपेठ पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

अमळनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकपदी दत्तात्रय युवराज निकम यांची नियुक्ती करण्यात आली.

शनीपेठ प्रभारी रंगनाथ त्र्यंबक धारबळे यांची यावल पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

यावल निरीक्षक प्रदीप खंडू ठाकुर यांची जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

पारोळा पोलिस निरीक्षक सुनील हंसराज पवार यांची नियंत्रण कक्ष, जळगावात बदली करण्यात आली.

पहूरचे निरीक्षक सचिन सीताराम सानप यांची पारोळा पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

आर्थिक गुन्हे शाखेचे एपीआय प्रमोद रामकृष्ण कठोरे यांची पहुर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

वरणगावचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन एकनाथ खंडेराव यांची यावल पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली.

भुसावळ बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांची वरणगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

पिंपळगाव हरेश्वरचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश राधाकिसन काळे यांची जळगाव शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली

जळगाव शहरच्या सहाय्यक निरीक्षक कल्याणी राजेश वर्मा यांची पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

पाचोर्‍याचे उपनिरीक्षक सोपान रमेश गोरे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.

तातडीने रूजू होण्याचे निर्देश
कायदा व सुव्यवस्था राखणे आणि जनहित जपणे या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्या असून सर्व संबंधित अधिकार्‍यांनी आपल्या नवीन ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !