नवापूरात मास्क न लावणे भोवले : न्यायालयाने सुनावली दंड व शिक्षा
नवापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सह मास्क लावण्याबाबत सूचना केल्यानंतरही या सूचनांचे दुर्लक्ष केल्याप्रकरणी जहांगीर उस्मान मिर्झा (24, शास्त्री नगर) याच्याविरुद्ध नवापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपीला न्यायालयात हजर केले असता एक हजार रुपये दंडासह पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईने विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
नवापूर पोलिस पेट्रोलिंग करीत असताना आरोपी लाईट बाजारात मास्क न लावता विनाकारण फिरत असताना त्यास मास्क लावण्याचे सांगण्यात आले मात्र त्याने न जुमानल्याने जहांगीर मिर्जा या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरूद्ध भादंवि 188, 269 कलमा अंतर्गत ही कारवाई करण्यात आलाी. आरोपीला न्यायालयानेपाच दिवसांची कोठडी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली आहे.





