यावल पालिकेत अधिकारी, कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा भराव्यात

शिवसेनेकडून उपजिल्हा अधिकारी जळगाव यांना निवेदन


Vacancies of officers and employees should be filled in Yaval Municipality यावल (4 जून 2025) : शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी जळगाव येथे उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदन देत व यावल नगरपरिषदेत अधिकारी व कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी केली. यावल येथून बदली करण्यात आलेल्या अभियंता सत्यम पाटील यांना यावल नगरपरिषदेतील प्रभारी कार्यभार देण्यात येवू नये, अशी देखील मागणी निवेदनातून करण्यात आली.

पालिकेत कर्मचारी तुटवडा
यावल नगर परिषदेला कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याकारणाने नगरपालिकेमध्ये पूर्णवेळ कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी वर्ग मिळावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देण्यात आले. सेनेेचे उपजिल्हा संघटक नितिन सोनार यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, यावल पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवरती कायमस्वरूपी पाणीपुरवठा अभियंता तात्काळ देण्यात यावा, तसेच इतर रिक्त जागेवरती यावल नगर परिषदेमध्ये सर्व कर्मचारी द्यावे, अभियंता सत्यम पाटील यांना पुन्हा कुठल्याही स्थितीमध्ये यावल नगरपरिषदेचा प्रभारी पदभार व जबाबदारी देण्यात देऊ नये त्याच्ंयाविरुद्ध जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मागील काळामध्ये सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात पुराव्यानिशी तक्रार केलेल्या आहे. त्या अनुषंगाने यावल नगरपरिषदेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पदावरती जबाबदारी देण्यात येऊ नये, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देते प्रसंगी शिवसेना युवा तालुकाध्यक्ष अजय तायडे, शिवसेना शहर उपाध्यक्ष चेतन सपकाळे, शिवसेना शहर उपाध्यक्ष राजू सपकाळे सह आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !