खुषखबर : मे महिन्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात
Good news: May’s amount in the accounts of beloved sisters न्युज डेस्क । मुंबई (5 जून 2025) : मे महिन्यात लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नसल्याने त्यांच्यात रक्कम कमी जमा होणार ? याबाबत उत्सुकता होती मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात. तुम्हाला फक्त तुमच्या बँकेच्या अॅपवर जाऊन अकाउंट बॅलेंस तपासता येणार आहे. सोबतच तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर एन्ट्री करुन घेऊ शकतात. पासबुकवर तुम्हाला कधी किती पैसे तुमच्या खात्यात जमा झाले याबाबत सर्व माहिती मिळेल.
अडीच लाख महिला अपात्र
लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू केल्याने तब्बल अडीच लाख सरकारी कर्मचारी असणार्या महिलांनीही योजनेचा लाभ घेतला आहे मात्र आता त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.
सरकारी कर्मचार्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते परंतु तरीही त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, आता अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.