लग्नातून परतताना नियंत्रण सुटल्याने कार बंगल्यात शिरली : नाशिकमधील अपघातात पाच जागीच ठार


Car loses control while returning from wedding, crashes into bungalow: Five killed on the spot in Nashik accident नाशिक (5 जून 2025) : नाशिक-कळवण रस्त्यावरील कोल्हापूर फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार एका बंगल्यावर जाऊन आदळली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. नातेवाईकाच्या लग्न समारंभातून परतत असताना हा अपघात घडला.

मृतांमध्ये शैला वसंत भदाण (62), त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदाण (50), चालक खालिक मेहमूद पठाण (50, रा. नामपूर), माधवी मेतकर (32) आणि त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर (04, रा. देवळा) यांचा समावेश आहे. भालचंद्र भदाण (52, रा. नामपूर) आणि उत्कर्ष मेतकर (12, रा. देवळा) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी रात्री सुमारे 10 वाजता झाला.

असा घडला अपघात
कार (एम.एच.41 बी.ई. 5443) सटाणा येथून नाशिककडे जात असताना, कोल्हापूर फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती एका बंगल्यावर जाऊन आदळली. धडक एवढी भीषण होती की बंगल्याबाहेर उभा असलेला सिमेंटचा खांबही वाकून गेला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !