लाडकी बहिण योजना बंद पडणार नाही : मुक्ताईनगरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
गणेश वाघ
Ladki Bahin Yojana will not be closed : Deputy Chief Minister Eknath Shinde assures in Muktainagar भुसावळ (6 जून 2025) : महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुक्ताईनगरात श्री संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्याला त्यांनी हजेरी दिल्यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.
सरकार अडचणीत आलेले नाही
लाडक्या बहिण योजनेमुळे विविध खात्यांचा निधी वळता करण्यात येत असून त्यामुळे सरकार अडचणीत आले आहे? असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिण योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आले नसल्याचे म्हटले. या योजनेसाठी पूर्णपणे आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र समृद्ध होवू दे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संतांची लाडकी बहिण संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्याला आपण आलो असून राज्यात चांगला पाऊस येवू, महाराष्ट्र समृद्ध होवू दे, अशी प्रार्थना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.