भुसावळात महसूल प्रशासनातर्फे महाराजस्व शिबिर : 673 लाभार्थींना लाभ


Maharajswam camp organized by Revenue Administration in Bhusawal: 673 beneficiaries benefited भुसावळ (10 जून 2025) : भुसावळ महसूल प्रशासनाच्या शहरातील वांजोळा रोडवरील आदित्य लॉन्समध्ये शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले. यावेळी 673 लाभार्थींना लाभ देण्यात आला. यावेळी एकूण 15 स्टॉल लावण्यात आले होते.

शिबिराचा 673 लाभार्थींना लाभ
प्रास्ताविक तहसीलदार निता लबडे यांनी करीत शिबिर घेण्यामागील उद्देश सांगितला. तहसील कार्यालयात पुरवठा विभागात आर.सी. नंबर विषयक व धान्य कोटा मंजुरीबाबत नागरीकांच्या तक्रारीबाबत शासनाकडुन ई-रेशनकार्ड व आर.सी.नंबर करीता पब्लीक लॉगीन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तसेच पुरेशी माहिती नसल्याने नागरिक तहसील कार्यालयात गर्दी करतात, असे त्या म्हणाल्या. नागरिकांच्या सोयीसाठी पब्लीक लॉगीन सोबत महाऑनलाईन पोर्टलवर जर ही सेवा देण्यात आल्यास नागरिकांची गैरसोय टळेल यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती तहसीलदारांनी मंत्र्यांकडे केली. एक हजार सातशे अपंग, विधवा व गरजूंना धान्याचा लाभ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

असा मिळाला शिबिराचा लाभ
शिबिरात सामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला व अपंगांना विविध प्रकारच्या सेवा उत्पन्नाचे 123 दाखले, वय व अधिवास विषयाचे 146 प्रमाणपत्र, जातीचे 68 दाखले, नॉन-क्रिमीलेअर 83, रहिवास दाखले- दोन, जिवंत 7/12- 16, संजय गांधी योजना- 72, ई-शिधापत्रिका- 63, धान्य योजनेचा मंजुरी लाभ- 94 लाभार्थींना तसेच प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सहा लाभार्थींना मंजुरी बाबत पत्र/आदेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. मुख्याधिकारी राजेंद्र फातले, गटविकास अधिकारी सचिन पानझडे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सर्व कार्यालयाचे प्रमुख व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.विविध विभागाच्या योजनेची माहिती दिल्यानंतर योजनेचे ऑनलाईन फार्मदेखील भरण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !