डांबर वाहतूक करणार्या डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
Biker killed after being hit by dumper transporting asphalt नाशिक (12 जून 2025) : नामपूर-मालेगाव रस्त्यावरील अंबासन येथील निमधरा फाट्याजवळ डांबर वाहतूक करणार्या डंपरच्या चाकाखाली दुचाकीस्वार सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाइकांनी आक्रोश करीत फाट्यावर एक तास रास्ता रोको केला असता जायखेडा पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.
मालेगावहून डांबर घेऊन नामपूरच्या दिशेने भरधाव जाणारा डंपर (एमएच 41, एयू 5353) वाहनाला ओव्हरटेक करीत असताना दुचाकीस्वार अंकुश दीपक ठाकरे (22, रा. श्रीपूरवडे, ता. बागलाण) दुचाकी (एमएच 41, एएक्स 0605) ला कट लागल्याने दुचाकी रस्त्यावर फेकली गेली तर अंकुश थेट चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली व नातेवाइकांना अपघाताची माहिती दिली. एकुलता मुलगा अपघातात मरण पावल्याने परिसरातील नातेवाइकांनी एकच आक्रोश केला व मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रास्ता रोको केला.