खासदार संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल : म्हणाले, देशात ‘डी’ कंपनीचे राज्य !


MP Sanjay Raut attacks Mahayuti: He said, ‘D’ Company is ruling the country! मुंबई (19 जून 2025) : खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर हल्लाबोल करीत देशात डी कंपनीचे राज्य सुरू असल्याचे म्हटले आहे. भरत गोगावलेंचे पुढे येणारे व्हिडिओ हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे कृत्य असून मुख्यमंत्र्यांनी आता पीए प्रमाणेच मंत्रीदेखील तपासून घ्यावेत, असे ते म्हणाले आहेत.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, एका ठिकाणी प्रत्यक्ष दाऊद आणि एका ठिकाणी डरपोक लोकांचे राज्य आहे. या दोन डी विरुद्ध शिवसेना हा एकमेव पक्ष ताकदीने लढत आहे. आमच्या पाठीवर वार करत काही लोकं निघून गेले पण आम्ही छातीवर वार सहन करत लढणार्‍यांचा हा पक्ष आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

शिंदेंच्या पक्षाचे संस्थापक गुजरातमध्ये
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा आहेत. त्यांचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा काही संबंध नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापनदिन हा सुरत, अहमदाबादमध्ये साजरा करायला हवा, असा टोला राऊतांनी लगावला आहे. अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की मराठी माणसांच्या एकजुटीला तडे जावे. त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण व्हावा आणि म्हणून शिंदेंकडून मुंबईत वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिंदेंनी पोस्टरवर जो आनंद दिघेंचा फोटो वापरला त्यावर राऊत म्हणाले की, आनंद दिघे हे काही शिवसेनाप्रमुख नव्हते ते शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख होते.

ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनतेची इच्छा
संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. त्याचा स्वीकार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे. यावर उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करतील. मुंबईसाठी मराठी माणसांसाठी शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे, असे म्हणत त्यांनी जागा वाटपावर सूचक विधान केले.

मंत्री तपासून घेणं गरजेचे
संजय राऊत म्हणाले की, शिंदेंचा एक गट आघोरी विद्येतून तयार झाला आहे. भरत गोगावलेंचे पुढे येणारे व्हिडिओ हे महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही कृत्य आहे. राज्याने अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जसे मंत्र्यांचे पीए तपासून घेत आहेत. तसे त्यांनी मंत्री तपासून घेणं गरजेचे आहे. अघोरी विद्येमध्ये रममान असणारे मंत्री महाराष्ट्राच काय भलं करणार. ही आघोरी विद्या जी सुरू आहे ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करुन तिथे आमचा नेता यावा यासाठी हे आघोरी प्रकार शिंदे गटाचे लोक करत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !