ट्रक-जीपच्या भीषण धडकेत दोघे ठार

Two killed in horrific truck-jeep collision ठाणे (19 जून 2025) : क्रुझर जीप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होवून दोघांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात समृद्धी महामार्गावर वाशिंद आणि आमणे दरम्यान गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडला.
परभणी जिल्ह्यातील एक कुटुंब चारचाकीने (एम.एच.22 डब्ल्यू. 5360) घेऊन कुटुंबासह भिवंडी येथील नातेवाईकांकडे येत होते. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्र. 690 जवळ पावसामुळे रस्ता ओला होता आणि चालकाला झोप येत होती. यामुळे समोर जात असलेल्या ट्रक (एम.एच.48 सी.बी.3953) ला भरधाव वेगात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सात प्रवासी गंभीर जखमी झाले.
मृतांमध्ये अब्दुल पाशा शेख (वय 65) आणि जाहीद सिद्दिकी (वय 40) यांचा समावेश आहे. अपघातग्रस्तांमध्ये 2 लहान मुले, 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून त्यातील दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
