जेजुरीजवळ भीषण अपघात ; आठ जण ठार


Fatal accident near Jejuri ; Eight people killed पुणे (19 जून 2025) : पुणे जिल्ह्यातील जेजुरी-जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाबा समोर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात होवून आठ जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

जेजुरीहून मोरगावकडे भरधाव वेगाने जात असलेली स्विफ्ट डिझायर कार (एम.एच.42 एक्स.1060) ही रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप टेम्पो (एम.एच.12 एक्स.एम.3694) ला धडकली. हा अपघात श्रीराम ढाब्याजवळील एका कंपनीसमोर घडला. अपघातावेळी टेम्पोमधून सामान उतरवण्याचे काम सुरू होते. ही धडक इतकी जोरात होती की, ही कार टेम्पोच्या बाजूला असणार्‍या कार ( क्र.एम एच 12 टी के 9483) वर आदळली.

यांचा ओढवला मृत्यू
भीषण अपघातात सोमनाथ रामचंंद्र वायसे, रामु संजीवन यादव (रा. नाझरे कप ता. पुरंदर), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), अक्षय शंकर राऊत ( रा. झारगडवाडी, ता. इंदापूर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. आणखी एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !