फत्तेपूरातील खुनाची उकल : मद्यपी मुलाचा पिर्त्याीनेच काढला काटा : त्रिकूटाला बेड्या

जळगाव गुन्हे शाखेसह फत्तेपूर पोलिसांची कामगिरी : रक्ताने भरलेली चटई भरलेली तपासातील दुवा


Fatehpur murder solved : Alcoholic boy’s father killed him himself : Trio arrested जळगाव (22 जून 2025)  : मद्यपी मुलाकडून कुटुंबियांना सातत्याने शिविगाळ व मारहाण होत असल्याने त्यास कंटाळून पित्यानेच मुलाच्या डोक्यात भला मोठा दगड टाकून त्याचा खून केला तर भावासह काकाने मृतदेहाची विल्हेवाट मदत केल्याचा प्रकार फत्तेपूर पोलिस ठाणे हद्दीत घडला. सुरूवातीला अनोळखी वाटणार्‍या पुरूषाची ओळख पटल्यानंतर संयुक्त तपासात खुनाचा प्रकार उघड होवून तिघांना बेड्या ठोकण्यात यंत्रणेला यश आले.

असे आहे खून प्रकरण
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीत कसबापिंप्री ते पिंपळगांव चौखांबे रस्त्यावर रविवार, 22 जून रोजी रोजी सकाळी सात वाजतात अनोळखीचा मृतदेह आढळला. घातपाताचा प्रकार लक्षात घेता पोलिसांनी ओळख पटवण्यावर भर दिला. मयत हा कसबा पिंप्री गावातीलच राहणार असल्याची व शुभम धनराज सुरळकर असल्याची ओळख पटताच पोलिसांचे पथक मयताच्या घरी धडकले. मृताचे व त्याच्या परिवाराचे काही दिवसांपासून खटके उडाल्याचे व त्यातून पत्नी माहेरी निघून गेल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता खोलीतील चटईवर रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांनी ही चटई तपासार्थ ताब्यात घेत मृताचे वडील धनराज सुपडु सुरळकर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

डोक्यात घातला दगड
मुलगा शुभम हा नेहमी घरी दारु पिऊन आल्यानंतर घरातील आम्हा सर्वांना विनाकारण शिविगाळ, मारहाण करत असे. त्याच्या या वागण्यामुळे त्याची पत्नीदेखील त्याला सोडून गेली. मृताचा त्रास होऊ लागल्याने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला व रात्री आम्ही सगळे झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातल्याने तो जागीच मरण पावला व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुसरा मुलगा गौरव धनराज सुरळकर तसेच माझा मोठा भाऊ हिरालाल सुपडु सुरळकर यांना बोलावून स्वतःच्या वाहनातून पिंपळगाव चौखांवे रोडवर मृतदेह टाकल्याची कबुली धनराज सुरळकर यांनी दिल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार विनोद पाटील, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक राहुल पाटील, नाईक हेमंत पाटील, कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, कॉन्स्टेबल राहुल महाजन, कॉन्स्टेबल भूषण पाटील, चालक हवालदार भरत पाटील, दर्शन ढाकणे आदींच्या पथाकने केली. तपास सहा.पोलिस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !