दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीलाच संपवले


He killed his wife for not paying for alcohol मुंबई (24 जून 2025) : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीलाच संपवण्यात आल्याची घटना गोरेगाव पश्चिममधील भगतसिंग नगर भागात सोमवारी सकाळी घडली. आरोपी वसीम शेख याने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. यानंतर अवघ्या दोन तासात बांगूर नगर पोलिसांनी त्याला राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दारुसाठी पैसे न दिल्याचा राग
आरोपी वसीम शेख व त्याची पत्नी गौशिया शेख (25) हे दोघे गोरेगाव पश्चिमेच्या भगतसिंग नगर क्रमांक 2 येथे राहत होते. वसीमला दारूचे अतिव्यसन असून त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वसीमने दारूसाठी गौशियाकडे पैसे मागितले. तिने नकार दिल्यावर रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळून खून केला.

हत्या केल्यानंतर वसीम घरातून पसार झाला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी रेल्वे मार्गाने पळून जाणार असल्याची माहिती मिळताच बांगूरनगर पोलिसांनी राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावला. अवघ्या दोन तासांत, दुपारी सुमारे बाराच्या सुमारास, आरोपीला ताब्यात घेण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !