महानिर्मितीतर्फे 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis मुंबई (24 जून 2025) : राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2.0’ अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार असून या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकर्यांना लाभ होणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंगळवारी मुंबई मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या ऊर्जा निर्मितीबाबतच्या भावी वाटचालीची तपशीलवार व विस्तृत माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करुन कार्बन उत्सर्जनात घट आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच शेतकर्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा देऊन शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे.