भुसावळच्या ‘संकल्प’ची 23 व्या वर्षी एनडीएतून लेफ्टनंटपदावर भरारी


Bhusawal’s ‘Sankalp’ rises to the rank of Lieutenant from NDA at the age of 23 भुसावळ (25 जून 2025) : शहरातील जामनेररोडवरील रहिवासी संकल्प चौधरी यांनी अवघ्या 23 व्या वर्षी भारतीय सैन्य दलाच्या जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर रायफल दलाच्या लेफ्टनंटपदाची संधी मिळाली आहे. इयत्ता पहिलीपासून सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणार्‍या संकल्पने अवघड व काठीण्यपातळी असलेल्या एनडीए (नॅशनल डिफेन्स अकादमी) मधून लेफ्टनंट पदापर्यंतची भरारी घेतली आहे.

23 व्या वर्षी मोठा पदावर संधी
भुसावळातील संकल्प देविदास चौधरी तरुणाची वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी भारतीय सैन्यदलात मोठ्या पदावर संधी मिळवली आहे. जम्मू अँड काश्मीर रायफलमध्ये लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली आहे. सैन्यदलाचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या लेफ्टनंट पदावर नियुक्ती देण्यात आली. संकल्प हा वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील कर्मचारी देविदास चौधरी यांचा सुपुत्र आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूल , उच्च माध्यमिक शिक्षण डिफेन्स अकॅडमी संभाजीनगर येथून नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये सिलेक्शन झाले. नंतर पुणे खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये तीन वर्षे सैन्य दलाचे प्रशिक्षण घेतले .भारतीय सैन्य दलाच्या डेहराडून येथे 1 वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता 14 जूनपासून लेफ्टनंटपदी जालंधर येथे नियुक्ती झाली आहे.









तिसर्‍या प्रयत्नात मिळवले यश
संकल्पने एनडीएचा पहिला प्रयत्न नोव्हेंबर 2020 मध्ये केला मात्र पहिल्या प्रयत्नात मुलाखतीमध्ये त्याला अपयश आले. मात्र अपयशच त्याच्या यशाची पायरी बनले. आपले कोठे चूकते आहे, याचा शोध घेवून त्याने सुधारणा केली. यानंतर 2021 मध्ये परिक्षा पास होऊन मुलाखतीत काही निकषांवर तो अपयशी ठरला. मात्र जिद्द सोडली नाही. यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या परीक्षेत त्याने पुन्हा परीक्षा व मुलाखत यशस्वी केली.

कठीण परिश्रमातून यश
संकल्पच्या निवडीमुळे भुसावळच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला आहे. संकल्पचे वडील देविदास चौधरी हे वरणगाव आयुध निर्माणीत जेडब्लूएम आहेत. तर आई गृहिणी आहे. ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावी पूर्ण झाल्यानंतर संकल्पने संभाजीनगर येथे डिफेन्स करिअर अकादमीत प्रवेश घेतला होता. 11 वी 12 वीनंतर त्याने एनडीएची परिक्षा दिली. अंत्यत कठीण प्रशिक्षण यशस्वी करुन भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

होतकरुंना मार्गदर्शन करणार
पहिलीपासून सैन्यदलात जाण्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीनेच प्रयत्न केले. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर दुप्पटीने अभ्यास सुरु केला. तिसर्‍या प्रयत्नात यश आले. केवळ लेफ्टनंट पदापर्यंत थांबयचे नाही, पूढे कॅप्टन व ब्रिगेडीअर पर्यंत मजल घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असल्याचे लेफ्टनंट संकल्प चौधरी म्हणाला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !