प्रौढ महिलेचा खून करीत मृतदेह फेकला : पारोळा तालुका हादरला      


पारोळा (26 जून 2025) : 45 वर्षीय महिलेचा खून करीत मृतदेह जंगलात फेकण्यात आल्याची घटना पारोळा तालुक्यातून समोर आली आहे. मृताची अद्यापही ओळख पटली नसल्याने पोलिसांकडून आधी मृतदेहाची ओळख पटवण्यावर भर दिला जात आहे. पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात बुधवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास गोणपाटात महिलेचा मृतदेह सापडल्याचा प्रकार समोर आला.

काय घडले नेमके
पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात असलेल्या सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण बकर्‍या चारून घरी परत येत असताना त्यांना एका महिलेचा खून करून मृतदेह गोणीत टाकून तिला फेकून दिल्याचे आढळून आले. महिलेचे हातपाय बांधलेले अवस्थेत होते. ही घटना दोन दिवसाआधी घडली असावी, असा अंदाज आहे.









महिलेची ओळख पटवण्यावर भर
हा परिसर अमळनेर व पारोळा तालुक्याला लागून असल्याने घटनास्थळी आधी अमळनेर पोलिस पोहोचले. त्यानंतर ही घटना पारोळा तालुक्याच्या हद्दीत असल्याची खात्री झाली. बुधवारी रात्री दहा वाजल्यानंतर पारोळा पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत पाटील, सुनील हटकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मृताची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !