जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : अमरावतीच्या अट्टल खिसे कापणाऱ्या टोळीला बेड्या

Jalgaon Crime Branch’s performance: Gang of persistent pickpockets from Amravati caught जळगाव (26 जून 2025) : जळगाव गुन्हे शाखेने खिसेकापूंच्या अमरावती जिल्ह्यातील टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. अरोपींकडून इंडिका कार, पाच मोबाईल, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
काय घडले जळगावात
बुधवार, 25 जून रोजी पोलीस हवालदार प्रवीण भालेराव आणि अक्रम शेख यांना जळगाव बसस्थानकात अमरावती येथील रेकॉर्डवरील खिसेकापू गुन्हेगार आल्याचे कळाले. गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, पोलिस हवालदार अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, पोलिस नाईक किशोर पाटील, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे आदींनी तीन संशयित व्यक्ती गर्दीचा फायदा घेऊन चोरी करताना दिसताच त्यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्यांनी अहमद बेग कादर बेग (62, रा.मुजफ्फरपुरा, नागपुरी गेट, अमरावती), हफिज शाह हबीब शाह (49, रा.बलगाव सकीनगर, अमरावती) व अजहर हुसेन जफर हुसेन (49, रा.सुपिया मजिद समोर, रहमत नगर, अमरावती) अशी आरोपींनी नावे सांगितले. आरोपींनी मंगळवार, 24 जून रोजी दुपारी जळगाव बसस्थानकात बसमध्ये चढणार्या एका प्रवाशाच्या खिशातून 100 रुपयांच्या दोन नोटांची बंडले चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींची अंगझडती आणि त्यांच्या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडून 33 हजार 830 रुपयांची रोकड, 17 हजार 500 किंमतीचे पाच मोबाईल फोन, एक रेक्झीन बॅग आणि पाच लाख किंमतीची एक टाटा इंडिका व्हिस्टा कार असा एकूण पाच लाख 51 हजार 530 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
विशेष म्हणजे, आरोपी अहमद बेग कादर बेग याच्याविरुद्ध अमरावती शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही चार गुन्हे दाखल आहेत.
यांनी केली कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, पोलिस हवालदार सुनील दामोदरे, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, पोलिस नाईक किशोर पाटील, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
