मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी : चोरीचा गुन्हा 12 तासात उघड

Muktainagar Police’s performance: Theft case solved within 12 hours मुक्ताईनगर (27 जून 2025) : मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथे बंद घरातून चोरट्यांनी 56 हजारांचा मुद्देमाल लांबवला होता. मुक्ताईनगर पोलिसांनी अवघ्या 12 तासात घरफोडीची गुन्ह्याची उकल करीत दोघांना अटक केली.
निमखेडी बु.॥ गावातील वैभव विकास पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीचे देव, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण 56 हजारांचा ऐवज चोरीला गेला. 23 जून रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुक्ताईनगरचे नूतन पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना यांना हा गुन्हा आरोपी गोपाल उर्फ सुरेशसिंग सिमाभाई सोलंकी आणि गणेश सिमाभाई सोलंकी (चिखल्या,, ता.अंजड, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) यांना केल्याची माहिती मिळाली व संशयीत सध्या सिनफाटा, हलखेडा, ता.मुक्ताईनगर येथे 10 वर्षांपासून हे दोघेही स्थानिक शेतकर्यांकडे काम करत असल्याचे कळताच त्यांना ताब्यात घेताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
30 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल, पाच हजार रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल व पाच हजार रुपये किंमतीचे चांदीचे देव असा एकूण 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक जाधव, पोलिस नाईक प्रदीप इंगळे, हरीश गवळी, अंमलदार अनिल देवरे, सागर साबे, प्रवीण जाधव आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला.
