प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाचा खून : दोघांना अटक

Murder of a young man due to a love triangle: Two arrested कुपवाड (28 जून 2025) : प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाचा खून करण्यात अ ाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
कुपवाड एमआयडीसीमधील बंद अवस्थेत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासमोरील रस्त्यावर उमेश मच्छिंद्र पाटील (21, रा. श्रीनगर, मशिदीजवळ, कुपवाड) याचा डोक्यावर शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कुपवाड पोलिसांच्या मदतीने संशयित साहिल ऊर्फ सुमित मधुकर खिलारी (24, मूळ रा.बुलढाणा, सध्या रा. बामणोली), सोन्या ऊर्फ अथर्व किशोर शिंदे (20, रा.बामणोली) या दोघांना अटक करून अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले.

असे आहे खून प्रकरण
उमेश पाटील हा कुपवाड एमआयडीसीमधील ऐरावत पॅकेजिंग या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम पाहत होता. संशयित सोन्या ऊर्फ अथर्व शिंदे हा देखील याच कंपनीत काम करत होता. उमेश आणि सोन्या यांच्यात प्रेमप्रकरणावरून धुसफूस सुरू होती. तसेच दोघांचा जोरदार वाद झाला होता. त्यामुळे सोन्याला उमेशवर राग होता. याच रागातून त्याने साथीदार साहिल आणि अल्पवयीन युवकाच्या मदतीने उमेशचा काटा काढायचा ठरवले. उमेश शुक्रवारी सकाळी 9 वाजता कामावर गेला होता. कामावर जाण्यासाठी महिन्यापूर्वी नवीन दुचाकी (एमएच 10 ईएन 6601) घेतली होती. रात्री नटराज कंपनीजवळ साहिल, सोन्या आणि अल्पवयीन मुलाने उमेशला अडवून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. उमेश गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर हल्लेखोर पळाले.
दरम्यान, रात्री 9.45 च्या सुमारास उमेश पाटील याच्यावर हल्ला झाल्यानंतर कंपनीतील एका कामगाराने याबाबत उमेशच्या घरी जाऊन आईवडील तसेच भावाला ‘उमेशला काहीतरी झाले आहे. तो नटराज कंपनीजवळ पडला आहे’ असे सांगितले. त्यामुळे उमेशचा भाऊ महेश कामगाराच्या दुचाकीवर बसून घटनास्थळी गेला. या वेळी उमेश पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्यावर वार झाल्याचे दिसत होते.
पोलिसांना संशयित साहिल खिलारी वन विभागाच्या रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने साथीदार सोन्या शिंदे व अल्पवयीन युवक अशा तिघांनी खून केल्याची कबुली दिली. तिघांना कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले.
मृत उमेश आणि संशयित सोन्या यांच्यात प्रेमप्रकरणावरून वाद झाला होता. प्रेमाचा त्रिकोण झाला होता. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. उमेश हा सुपरवायझर असल्यामुळे तो सतत कामाला जुंपून स्वत: महिलेशी जास्त बोलत असल्याचा सोन्याला राग होता. त्यातून साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.
