अजित पवार स्पष्टच म्हणाले ; हिंदीच्या मुद्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होणार : मोर्चा न निघण्यासाठी प्रयत्न


Ajit Pawar clearly said; Hindi issue will be discussed in the cabinet: Efforts to prevent the march पुणे (29 जून 2025) : कोणतीही आघाडी किंवा युती असेल तर थोडाफार मतप्रवाह वेगळा असू शकतो, पण राज्याच्या हिताचे काय आहे जनतेच्या हिताचे काय, भवितव्याच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे हे पाहणं महत्त्वाचे असते. त्यावर चर्चा करायची असते, चर्चेतून मार्ग निघतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. राज्यात हिंदीच्या मुद्यावरून वातावरण पेटले असताना पवार म्हणाले की, हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो, आज आमची कॅबिनेट आहे त्यामध्ये आम्ही या विषयावर चर्चा करु, असे अजित पवार म्हणाले.

ठाकरे बंधू त्यांचा निर्णय घेतील
अजित पवार म्हणाले की, ठाकरे बंधूंनी एकत्र यावे की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ह्यात आपण नाक खुपसायचे काहीच कारण नाही. आपण त्यांना वेगळे व्हा, असे सांगितले नव्हते. काय करावे हा त्यांना अधिकार आहे, ते स्वत:बद्दल निर्णय घेतील.









इंग्रजी माध्यमांना मराठी सक्ती केली
अजित पवार म्हणाले की, सगळ्याच पालकांना आपल्या मुलांना कुठली भाषा यावी हे वाटत असते. तरीदेखील मराठी ही आपली मातृभाषा आहे. कुणी नोकरी, कामासाठी इथे आले असेल तर त्यांच्या मुलांना मराठी आली पाहिजे म्हणून आपण इंग्रजी माध्यमांना मराठी भाषा कंपलसरी केली आहे. तोच आपला त्या मागचा दृष्टीकोण आहे.

मराठी येणार्‍याला हिंदी येतेच
अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाचे आपल्या मातृभाषेवर प्रेम आणि अपार श्रद्धा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधल्या काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिली. गेली अनेक वर्षे ही आपल्या सर्वांची मागणी होती ती मोदी सरकारने पूर्ण केली. इंग्रजी शाळेत शिकणार्‍यांना पहिलीपासून मराठी, इंग्रजीचे शिक्षण घ्यावे आणि पाचवीपासून हिंदीचे शिक्षण घ्यावे. ज्याला मराठी येते त्यालरा हिंदीदेखील लिहिता आणि वाचता येते. मराठी आणि हिंदीची लिपी जवळपास सारखीच आहे. पाचवीपासून जर शिकला तरी हे चालू शकते, असे अजित पवार म्हणाले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !