दुचाकींचा भीषण अपघात : तिघे ठार


Terrible two-wheeler accident : Three killed बीड (29 जून 2025) : दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. हा अपघात बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर-हातोला रस्त्यावर लिमगाव पाटीजवळ शनिवारी रात्री 7.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातात अभय सतीश चव्हाण (रा. बर्दापूर) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर समोरून येणार्‍या दुचाकीवरील फारूख रहिमखाँ पठाण आणि नासीर खाजामियाँ शेख (दोघेही रा. पानगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूरकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात ऋषिकेश अशोक चव्हाण हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचा चक्काचुर झालाय. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केलं. अपघाताची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !