हिंदी सक्तीचा निर्णय सरकार रद्द करणार असल्यास त्याचे स्वागतच : खासदार संजय राऊत

If the government decides to make Hindi mandatory, it will be welcomed: MP Sanjay Raut मुंबई (29 जून 2025) : ठाकरे बंधूंनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे हिंदी सक्ती रद्द करण्याचा निर्णय सरकार घेणार असेल तर आम्ही नक्कीच त्यांचे स्वागत करू, शेवटी लोकभावने पुढे सरकारला झुकावं लागते, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
मुंबईत 5 रोजी मोर्चा
हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले की, साडेअकरा कोटी मराठी जनतेने एका आवाजात सांगितलं आहे. आम्हाला ही सक्ती मान्य नाही. संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा तालुका आणि तहसील पातळीवर हजारो शिवसैनिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या शासन निर्णयाची आम्ही होळी करतोय. यासंदर्भात जर पहिलाच आदेश होता तर परत का काढला ? तेव्हा हे झोपले होते का ? सरकारला कळतय का ते काय बोलतात ? मी शासनात नसलो तरी शासन कसं चालतं हे मला माहिती. मी गेली 25 वर्ष संसदेत आहे. आमचं शासन चालतं तुमच्या गुंड, टोळ्या चालवतायत, असे खासदार संजय राऊत म्हणाले .
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मोर्चा ही भविष्यातील दोन ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असे मी म्हणत नाही. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकीकरणाची नांदी आहे. मराठी माणसाचं जे संघटन बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात उभं केलं, याला तडे देण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांनी केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यान मराठी माणूस एकत्र होणार असेल तर त्याचं स्वागत करायला हवे, असेही राऊत म्हणाले.
