जळगाव एसीबीची मोठी कारवाई : आठ हजारांची लाच घेताना मोंढाळासह चोरवड वनपाल जाळ्यात

Jalgaon ACB’s big action: Mondala and Chorwad forest guard caught while taking a bribe of Rs. 8,000 जळगाव (2 जुलै 2025) : जळगाव (2 जुलै 2025) : सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी आठ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना मोंढाळा, ता.पारोळा येथील वनपाल दिलीप भाईदास पाटील (52, रा.देवपूर, धुळे) व चोरवड वनपाल वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (38, रा.पारोळा) यांना जळगाव एसीबीने अटक केली. या कारवाईने वनविभागातील लाचखोर प्रचंड हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
पारोळा तालुक्यातील 44 वर्षीय तक्रारदार हे शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडांची शेत मालकाकडून खरेदी करण्याचा व्यापार करतात. तक्रारदाराने पारोळा तालुक्यातील इंधवे शेतकर्यांच्या शेतात असलेल्या सागाचे झाडे तोडण्याचा शेतकरी व तक्रारदार यांच्यात साठ हजार रुपयांचा सौदा निश्चित केला. शेतकर्याने उपवन विभाग, पारोळा येथून सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी पत्र दिले मात्र परवानगी देण्यासाठी तक्रारदाराकडे आरोपी दिलीप पाटील यांनी आठ हजारांची लाच मागितली. 19 जुन 2025 रोजी याबाबत तक्रार आल्यानंतर पडताळणी करण्यात आली. ठरल्याप्रमाणे 2 जुलै रोजी लाच देण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर बुधवार, 2 रोजी पाटील यांच्या सांगण्यावरून आरोपी महिला वैशाली यांनी लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.