वार्‍याने छत्री उलटली : आई मात्र जीवाला मुकली !


The wind overturned the umbrella: but the mother lost her life! कोल्हापूर (2 जुलै 2025) : मुलासोबत दुचाकीवरून जाणार्‍या मातेचा अपघाती मृत्यू ॅझाला. जोरदार वारा आल्यानंतर छत्री उलटली व महिलेचा तोल जावून पडल्याने मृत्यू झाला. मीना दिलीपराव मगदूम (वय 59, रा. ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. मीना या महापालिकेत आस्थापना विभागात शिपाई पदावर कार्यरत होत्या. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास महाद्वार रोडवर घडली.

मगदूम यांच्या पतीचे 25 वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. ते महापालिकेत पवडी विभागात होते. मीना यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. पतीचे अकाली निधन झाल्यानंतर खचून न जाता त्यांनी दोन मुले आणि मुलीचे शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा सोनार काम करतो. लहान मोबाइल दुकानात काम करतो. मोठ्या मुलाचे आणि मुलीचे लग्न लावून दिले. दीड महिन्यापूर्वीच लहान मुलाचे लग्न झाले.








वर्षभरात त्या निवृत्त होणार होत्या. निवृत्तीनंतर नातवंडांसोबत आयुष्याची संध्याकाळ निवांत घालवायचा विचार त्यांनी अनेकदा नातेवाइकांकडे बोलून दाखवला होता; पण काळाने अचानक घाला घातल्याने सुख उपभोगण्यापूर्वीच त्यांची एक्झिट झाली.

लहान मुलगा त्यांना रोज महापालिकेत सोडून पुढे मोबाइल दुकानात जात होता. मंगळवारी सकाळी माय-लेक दोघे नेहमीप्रमाणे दुचाकीवरून बाहेर पडले. पावसाची रिमझिम सुरू असल्याने मीना यांनी डोक्यावर छत्री धरली होती. वार्‍याच्या झोतात छत्री उलटी झाल्याने त्या तोल जाऊन पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत होऊन नाका-तोंडातून रक्त आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !