जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई : वरणगावातील संशयीत गावठी कट्टा व पाच काडतूसांसह जाळ्यात


Major action by Jalgaon Crime Branch : Suspect from Varangaon caught with a village knife and five cartridges जळगाव (3 जुलै 2025) : वरणगाव शहरातील आर्म अ‍ॅक्टमध्ये सहा महिन्यांपासून गुंगारा देणारा संशयीत गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने फुलगाव फाट्याजवळून केशव उर्फ सोनु सुनील भालेराव (22, रा.सिद्धेश्वर नगर, वरणगाव) याला अटक केली. आरोपीकडून गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीकृष्ण देशमुख तसेच पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, रवींद्र चौधरी आदींच्या पथकाने केली.









सहा महिन्यांपासून आरोपी पसार
आरोपी केशव भालेराव याच्यावर पूर्वी देखील वरणगाव पो.स्टे गु.र.न. 20/2025 अन्वये हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून गेल्या सहा महिन्यांपासून तो पसार असल्याचे निष्पन्न झाले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !