श्री विठ्ठल नामाच्या गजरात भुसावळातून विशेष रेल्वे पंढरपूरला रवाना

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दाखवला गाडीला हिरवा झेंडा


Union Minister of State Raksha Khadse gave the green signal to the vehicle. भुसावळ (5 जुलै 2025) : श्री विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेले शेकडो वारकरी शनिवार, 5 रोजी विशेष रेल्वेने पंढरपूर रवाना झाले. मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून विशेष रेल्वेद्वारे जळगावसह बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले.

मंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष गाडीची मागणी केली होती. त्यानुसार भुसावळ रेल्वे स्टेशन येथून शुक्रवार, 5 रोजी दुपारी दिड वाजता पंढरपूरसाठी निघणार्‍या गाडीस शुक्रवारी रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकार्‍यांसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी हिरवा झेंडा दाखवला.








उद्या गाडी पंढरपूरा पोहोचणारविशेष आषाढी रेल्वे गाडी शनिवार, 6 रोजी पहाटे 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार असून याच दिवशी रात्री 9 वाजता पंढरपूर येथून परतीच्या प्रवासाचा निघणार आहे रविवार, 7 रोजी भुसावळ येथे परतणार आहे.

मंत्री खडसे यांच्या खर्चातून विशेष ट्रेन
अनआरक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यामार्फत एकूण जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आली. ही सुविधा वारकर्‍यांसाठी मोफत आहे. यावेळी पंढरपूर वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांशी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाखडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह रेल्वे भुसावळ मंडळ व्यवस्थापक ईती पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महायुती व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत उपस्थित होते.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !