गोळीबारानंतर पाचोरा पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी : राहुलकुमार पवार नूतन प्रभारी


Pachora Police Inspectors removed after firing : Rahul Kumar Pawar new in-charge पाचोरा (6 जुलै 2025) : पाचोरा शहरातील बसस्थानकात भर दिवसा युवकाची गोळ्या झाडून क्रुरपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर पोलिस दलावर टीकेची झोड उठली होती. पाचोरा पोलिस निरीक्षक अशोक कचरु पवार यांच्याविरोधात सातत्याने असलेल्या तक्रारींचा सूर पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी तडकाफडकी निरीक्षक पवार यांना नियंत्रण कक्षात जमा केले असून पाचोरा शहरासाठी नूतन प्रभारी म्हणून चाळीसगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्याकडे धुरा दिली आहे. पवार यांनी रात्रीच पदभार स्वीकारला.

गोळीबारानंतर निरीक्षकांची बदली
पाचोरा शहरात 4 जुलै रोजी दिवसाढवळ्या आकाश मोरे या तरुणाची गजबजलेल्या बसस्थानकात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पाचोरा तालुक्यातील कायदा व सुवस्थेवर यानिमित्त प्रश्नचिन्ह निर्माण होताच जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पाचोरा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली.

राहुलकुमार पवार नूतन प्रभारी
पाचोरा शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधीत राखण्यासह गैर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चाळीसगाव ग्रामीणचे प्रभारी राहुल कुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्रीच त्यांनी आदेश येताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पवार हे अनुभवी निरीक्षक असून जिल्ह्यासह परजिल्ह्यात त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चित पाचोरा शहराला होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य
शहराच्या कायदा-सुव्यवस्थेला आपले प्रथम प्राधान्य असेल शिवाय सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यावर आपला भर असेल, असे निरीक्षक राहुलकुमार पवार म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !