कोंढव्यातील तरुणीवर बलात्कार : तपासात धक्कादायक सत्य आले समोर

Rape of a young woman in Kondhwa : Shocking truth revealed during investigation पुणे (6 जुलै 2025) : पुण्यात कुरीयर देण्यासाठी आलेल्या संशयीताने उच्च शिक्षीत तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती मात्र पोलिस तपासात आता धक्कादायक सत्य समोर आले आहे. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता असलेली तरुणी व तरुणीच्या संपर्कातील तरुण एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे मात्र या प्रकारामुळे मात्र नाहक डिलेव्हरी बॉयची बदनामी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
काय आहे तरुणीचा दावा
तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी कुरिअर बॉय असल्याचे सांगून घरात शिरला व तोंडावर स्प्रे फवारून बलात्कार केला मात्र तपासात वेगळ्याच बाबी उघड झाल्या. सुरुवातीला तरुणीने संबंधित तरुणाला ओळखत नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून ती त्याला ओळखत असल्याचे तिने मान्य केले.
पुणे पोलिसांना तपासात स्प्रेचा वापर झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. तरुणाने फोटो काढून ‘मी परत येईन,’ असा मजकूर लिहिल्याचा दावाही खोटा ठरला. तो फोटो तरुणीनेच अँपद्वारे एडिट केल्याचे स्पष्ट झाले. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याला तरुणीनेच घरी बोलावले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सुमारे 500 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली. शुक्रवारी याला एका लग्नसमारंभातून ताब्यात घेऊन कोंढवा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणले गेले. त्यानंतर पोलिसांनी तरुणी व आरोपीची समोरासमोर चौकशी केली. त्यांच्या पालकांनाही याबाबत माहिती दिली.
प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेऊन पोलिसांनी सध्या आरोपीला अटक न करता नोटीस देऊन सोडले आहे. तरुणीनेही काही गोष्टी चुकीच्या सांगितल्याचे मान्य केले, तरी आरोपीने जबरदस्तीचा केल्याचा तिचा दावा आहे.
संबंधित तरुण-तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून मित्र आहेत. ते नियमित एकमेकांना भेटायचे, दोघांमध्ये संभाषण असायचे. तरुणीनेच त्याला फोन करून घरी बोलावले होते, कुठलाही स्प्रे मारला नाही,’ असे तपासात समोर आले परंतु समाजात वेगळीच माहिती गेली असून, पोलिस आयुक्तांना पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती समोर मांडण्याच्या सूचना केल्या आहेत, तर या तरुणीने तक्रार करण्याचे कारण काय? याबाबतही तपास करण्याबाबत आदेश दिल्याचे पवार यांनी सांगितले.
