एरंडोल हादरले : महिलेचे हातपाय बांधून दागिण्यांसह रोकड लूटली

Erandol shocked: Woman tied up, cash and jewellery looted एरंडोल (7 जुलै 2025) : एरंडोल शहरातील प्रौढ महिलेचे हातपाय दोरीने बांधून तिघांनी 38 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व एक हजार 550 रुपयांची रोकड मिळून 39 हजार 550 रुपयांचा ऐवज लूटल्याची घटना शहरातील जय हिंद चौक परिसरात घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
काय घडले एरंडोल शहरात
एरंडोल शहरातील गांधीपुरा भागातील जयहिंद चौकात उषाबाई भिका बडगुजर (52) या एकट्याच राहतात. त्यांचे पती भिका बडगुजर यांचे 2003 मध्ये निधन झाले असून त्यांना दोन अपत्य आहेत. ते जळगाव येथे राहतात. सावत्र मुलगा अरुण भिका बडगुजर हा अधून-मधून एरंडोल येथे उषाबाई बडगुजर यांच्या घरी येत होता. तो उषाबाईला ठार मारण्याचे धमकावत होता.
रविवार, 6 जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास जेवण झाल्यावर उषाबाई या घराच्या पुढच्या खोलीमध्ये लोखंडी गेटला कुलूप लावून झोपल्या असताना रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अचानक तीन-चार जण घरात शिरले व त्यांनी उषाबाईचे तोंड व हात पाय दोरीने बांधले. त्यांनी उषाबाईच्या अंगावर असलेले दागिने व रोकड हिसकावली.
ही लूट संशयीत संशयीत अरुण भिका बडगुजर, शेखर भिका बडगुजर, मयूर अरुण बडगुजर (तिन्ही रा.जळगाव) व एका अज्ञाताने केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शंकर पवार करीत आहेत.
