भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची पुणे टास्क फोर्समध्ये बढतीवर बदली
Bhusawal Deputy Superintendent of Police Krishnat Pingle promoted to Pune Task Force भुसावळ (8 जुलै 2025) : राज्यातील सहा सहाय्यक पोलिस आयुक्त/पोलिस उपअधीक्षकांच्या बढतीवर बदल्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील आदेश राज्य शासनाचे संदीप ढाकणे यांनी काढले आहेत.
भुसावळ शहरात अल्पावधीत शहरवासीयांच्या गळ्यातील ताईत झालेले कृष्णात महादू पिंगळे यांची बढतीवर पुणे टास्क फोर्सवर पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पुण्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची ते आता यशस्वीपणे धुरा सांभाळणार आहेत.
अन्य अधिकार्यांच्या बढतीवर अशी झाली नियुक्ती
विजय लगारे- पोलीस उपआयुक्त, मुंबई
गणेश इंगळे – पोलीस उपायुक्त, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
मंगेश चव्हाण- अपर पोलिस अधीक्षक, लातूर
अभिजीत धाराशिवकर – पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर
पद्मजा चव्हाण – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, अहिल्यानगर




