समुदाय आरोग्यावर धोरणात्मक बदलांवर जनजागृती
जळगाव (9 जुलै 2025) : गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील समुदाय आरोग्य विभागाच्या वतीने समुदाय आरोग्यावर धोरणात्मक बदलांचा परिणाम (अलीकडील कायदे व त्याचा प्रभाव) या विषयावर एक वेबिनारातून जनजागृती करण्यात आली. यासाठी प्रिया दादाराव जाधव (कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, उपजिल्हा रुग्णालय, माळीपूर) येथे कार्यरत असलेले स्टाफ नर्स व सहा वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेले मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
वेबिनारमध्ये नविन कायद्याचे आरोग्य सेवा प्रणालीवर होणारे परिणाम, धोरण बदलांची अंमलबजावणी आणि त्याचा जनतेच्या आरोग्यावर होणारा परिणाम यासारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वेबिनारमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. वेबिनार ऑनलाईल माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख आणि एनएसएस संयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.





